साई वर्ल्ड सिटी इमारतीतील १८ व्या मजल्यावर लागलेल्या आगीत मोठे नुकसानसाई वर्ल्ड सिटी इमारतीतील १८ व्या मजल्यावर लागलेल्या आगीत मोठे नुकसान
पनवेल दि.१०(संजय कदम): पनवेल जवळील पळस्पे फाटा येथे नव्यानेच उभारलेल्या साई वर्ल्ड सिटी इमारत संकुलातील एका इमारतीच्या १८ व्या मजल्यावरील एका घरात आज सकाळी अचानकपणे लागलेल्या आगीत त्या घराचे मोठे नुकसान झाले आहे. 


        साई वर्ल्ड सिटी इमारत संकुलातील एका इमारतील १८ व्या मजल्यावर असलेल्या ब्लॉकला मधील रहिवाशी घराबाहेर पडत असताना अचानकपणे आग लागली व आगीचे लोळ बाहेर पडताच परिसरातील नागरिकांनी तातडीने पनवेल अग्निशामक दलाला कळवले व काही वेळातच पनवेल महानगरपालिका व सिडको अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी पोहचून त्यांनी आग आटोक्यात आणली. या आगीत घरातील सामानाचे मोठे नुकसान झाले आहेत. आग कश्यामुळे लागली आहे याचे कारण अद्यापही समजू शकले नाही. 


थोडे नवीन जरा जुने