पनवेल शहर महानगरपालिकेने सुशोभित केलेल्या वडाळे तलाव येथे ज्येष्ठ नागरिक महिला व लहान मुले यांच्यासाठी वेळ चांगली जाण्यासाठी खेळण्यासाठी एक सुंदर वास्तु महापालिकेने बनवली आहे.






पनवेल शहरातील महानगरपालिकेने सुशोभित केलेल्या वडाळे तलाव येथे नागरिकांची नियमित होणारी गर्दी, ज्येष्ठ नागरिक महिला व लहान मुले यांच्यासाठी वेळ चांगली जाण्यासाठी खेळण्यासाठी एक सुंदर वास्तु महापालिकेने बनवली आहे.
परंतु काही हुल्लडबाज तारूणांमुळे येथे येणाऱ्या ज्येष्ठ नागरिक महिला व लहान मुले यांना त्यांचा त्रास सहन करावा लागतो. काही मुले टू व्हीलर चा कर्कश्य आवाज करून तेथून फिरत असतात. अशा बऱ्याच तक्रारी तेथे येणाऱ्या नागरिकांनी शिवसेनेकडे केली.



याची दखल घेऊन पनवेल शहर शिवसेने कडून पनवेल शहर पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याशी चर्चा करून तेथील पोलीस चौकी पुन्हा सुरू करण्याचे व व त्याचप्रमाणे सकाळी ११ ते १ व संध्याकाळी ६ ते रात्री १० या वेळेत गस्त चालू करण्या संदर्भात चर्चा करण्यात आली व तसे निवेदन ही त्यांना पनवेल शहर शिवसेनेकडून देण्यात आले. सदर चर्चा करण्यासाठी उपमहानगरप्रमुख श्री महेश जी सावंत, शहर प्रमुख प्रसाद सोनावणे, उपशहर संघटक सिद्धेश खानविलकर, प्रभाग 19 चे विभाग प्रमुख अविनाश साफल्य, प्रभाग 14 चे विभाग विभाग प्रमुख आशिष पनवेलकर, शिवसैनिक हितेंद्र पेडामकर, हर्षल नायर उपस्थित होते.



थोडे नवीन जरा जुने