लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते ‘रामप्रहर’च्या दिवाळी अंकाचे प्रकाशन
पनवेल(प्रतिनिधी) वाढत्या सायबर क्राईम घटनांचा आढावा घेणारा व जनजागृतीपर ठरणारा 'दैनिक रामप्रहर' चा यंदाचा दिवाळी अंक वाचकांसाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मंगळवारी व्यक्त केला. ते दिवाळी अंक प्रकाशन
समारंभात बोलत होते.
रायगड, नवी मुंबईत वाचकांच्या पसंतीस उतरलेल्या ‘रामप्रहर’ने ऑनलाईन गंडा या शीर्षकाखाली दिवाळी अंक प्रसिद्ध केला आहे. या अंकाचे प्रकाशन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. या वेळी त्यांनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छादिल्
प्रकाशन समारंभास भाजपचे ज्येष्ठ नेते वाय.टी.देशमुख, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे सचिव डॉ.एस.टी.गडदे, मल्हार नेटवर्क प्रा. लि.चे संचालक दर्शनशेठ ठाकूर, ‘रामप्रहर’चे मुख्य संपादक देवदास मटाले, व्यवस्थापक दादाराम मिसाळ, वृत्त संपादक समाधान पाटील, उपसंपादक तन्वी गायकवाड-पवार, सायली रावले-वैद्य, आर्टिस्ट शशिकांत बारसिंग, वितरण विभागाचे महेश काळे आदी उपस्थित होते.
‘रामप्रहर’च्या दिवाळी अंकासाठी मुख्य आर्टिस्ट अरुण चवरकर, सुबोध ठाकूर, लेखापाल उद्धव घरत, कार्यालयीन कर्मचारी करण वाहुळकर यांचेही योगदान लाभले आहे.
Tags
पनवेल