मोटारसायकल वरून जबरीने मोबाईल खेचून चोरी करणाऱ्या टोळीस गुन्हे शाखा कक्ष ०२ पनवेल कडून अटक; ५,०२,७००/- रूपये किंमतीचे एकुण २९ मोबाईल फोन हस्तगत; १७ गुन्हे उघडकीस






मोटारसायकल वरून जबरीने मोबाईल खेचून चोरी करणाऱ्या टोळीस गुन्हे शाखा कक्ष ०२ पनवेल कडून अटक; ५,०२,७००/- रूपये किंमतीचे एकुण २९ मोबाईल फोन हस्तगत; १७ गुन्हे उघडकीस
पनवेल दि.०७(संजय कदम): मोटारसायकल वरून जबरीने मोबाईल खेचून चोरी करणाऱ्या टोळीस गुन्हे शाखा कक्ष ०२ पनवेल कडून अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून ५,०२,७००/- रूपये किंमतीचे एकुण २९ मोबाईल फोन हस्तगत केले आहेत. त्यांच्या अटकेमुळे १७ गुन्हे उघडकीस आणले आहेत.  




        नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे हदिदमध्ये काही अज्ञात आरोपी हे मोटर सायकल वरून येवून मोबाईल फोनवर बोलत पायी चालत जाणाऱ्या इसमांचे हातातील फोन जबरीने खेचुन चोरी करून घेवून जात असल्याबाबत अनेक गुन्हे दाखल आहेत. आरोपींनी अशा प्रकारे मोबाईल फोन जबरीने खेचुन नेणे अशा गंभीर गुन्हयांची तात्काळ उकल करण्याबाबत पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) दिपक साकोरे, अमित काळे, पोलीस उप आयुक्त गुन्हेशाखा यांनी आदेशीत केले होते. अशा प्रकारचे गुन्हयांमध्ये आरोपी हे त्यांच्याकडील मोटर सायकल वरून अचानक येवून क्षणाचा ही विलंब न घालविता मोबाईल फोन जबरीने खेचुन नेत असल्याने गुन्हयातील फिर्यादी व साक्षीदार यांचेकडुन आरोपींचे वर्णनाबाबत माहिती मिळविणे अवघड होते त्यामुळे सदरचे गुन्हे उघडकीस आणने पोलीसांना अतिशय आव्हानात्मक होते. सदर गुन्हयाचे तपासाचे अनुषंगाने गजानन राठोड, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हेशाखा, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, उमेश गवळी, गुन्हे शाखा कक्ष २, पनवेल, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये घडलेल्या गुन्हयांची माहिती प्राप्त केली





. घडलेल्या गुन्हयांचे घटनास्थळी भेटी दिल्या. गुन्हयातील फिर्यादी, साक्षीदार यांना भेटुन तांत्रिक तपासादम्यान आरोपींबाबत जास्तीत जास्त माहिती संकलीत करून अशा प्रकारचे गुन्हे करणारी काही ठराविक आरोपींची टोळी सक्रिय झाली असल्याची खात्री केली. गुन्हे शाखा कक्ष २, पनवेल चे पथकाने गोपनिय बातमीदाराच्या मदतीने आरोपींबाबत माहिती प्राप्त करून भारत प्रल्हाद राठोड (वय १९) करंजाडे, देवानंद विष्णु जाधव ( वय १९) कळंबोली, दिपक रमेश राठोड (वय १९) खिडूकपाडा,व वैभव किसन जगताप (वय २४) खांदा कॉलनी यांना अटक केली असून त्यांच्या कडून. त्यांच्याकडून ५,०२,७००/- रूपये किंमतीचे एकुण २९ मोबाईल फोन हस्तगत केले आहेत. त्यांच्या अटकेमुळे १७ गुन्हे उघडकीस आणले आहेत. सदरची उल्लेखनिय कामगिरी गुन्हे शाखा कक्ष ०२ पनवेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गवळी यांच्या नेतृत्वाखाली सपोनि प्रविण फडतरे, पोलिस उप निरीक्षक मानसिंग पाटील, दिलीप भंडे, सुनिल गिरी, पो.हवा. रमेश शिंदे, अनिल पाटील, तुकाराम सुर्यवंशी, मधुकर गडगे, सचिन पवार, रणजित पाटील, अजित पाटील, सागर रसाळ, दिपक डोंगरे, इंद्रजित कानु, रूपेश पाटील, निलेश पाटील, राहुल पवार, जगदिश तांडेल, पो.ना. अजिनाथ फुंदे, पो.शि. संजय पाटील, विक्रांत माळी, नंदकुमार ढगे, अमोल मोहिते, मपोशि आदिती काकडे यांनी केली आहे.


थोडे नवीन जरा जुने