पालिकेकडून मुखपट्टी लावण्याचे आवाहन
हिवाळा ऋतूमधील पनवेलचे वाढते वायू प्रदूषण ध्यानात घेता पनवेल महापालिकेने श्वसनदाह रुग्णांना मुखपट्टी लावण्याचे आवाहन केले आहे. यासाठी पनवेल पालिकेच्या आरोग्य विभागाने मुखपट्टी पाळण्याची सूचना पाच वेगवेगळ्या घटकांना केली आहे. 


यामध्ये पाच वर्षांखालील मुले, वृद्धपकाळातील व्यक्ती, गरोदर माता, श्वसन व हृदयाचे दुर्धर आजार असलेली व्यक्ती, तसेच ज्या व्यक्तींची पोषणस्थिती खराब आहे. स्वयंपाक, उष्णता, प्रकाशासाठी जीवाश्म इंधनाचा वापर करणाऱ्या व्यक्तींसोबत वाहतूक पोलिस, वाहतूक स्वयंसेवक, कामगारांना आवाहन केले आहे.


थोडे नवीन जरा जुने