पनवेल दि.१९(संजय कदम): पनवेल शहर पोलिसांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक होत असून त्यांच्या पोलीस शिपायाला बेवारस स्थितीत मिळालेली हॅन्डबॅग त्यांनी सदर मालकाला संपर्क साधून परत केली आहे.
पनवेल शहर पोलीस स्टेशनचे नेमणुकीस असलेले पोलीस शिपाई सुखदेव वाणी हे रात्रपाळी कर्तव्यावर असताना त्यांना गार्डन हॉटेल येथे पहाटे एक वाजेच्या सुमारास एक हँड पर्स मिळून आली असता त्यांनी सदर पर्स उघडून पाहणी केली असता, त्यामध्ये काही रक्कम व विवो कंपनीचा मोबाईल व शरद रघुनाथ सावंत राहणार डोंबिवली ठाणे या नावाचे आधार कार्ड मिळून आले.
शरद सावंत यांचा संपर्क क्रमांक वरती सुखदेव वाणी यांनी संपर्क करून त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की ते स्वतः व त्यांचा कर्मचारी अजय बाळाराम गायकर राहणार नारपोली ठाणे हे दोघे बाईकवरून पनवेल ते कळंबोली असा प्रवास करत असताना त्यांची हॅन्ड बॅग पडली असल्याचे त्यांनी सांगितल्याने. त्यानुसार अक्षय बाळाराम गायकर हे स्वतः पोलीस ठाण्यात येऊन त्यांनी त्यांचे मालक शरद रघुनाथ सावंत यांची हरवलेली बॅग ताब्यात घेऊन चेक केले असता त्यामध्ये त्यांनी ठेवलेले पंचवीस हजार रोख रक्कम विवो कंपनीचा मोबाईल व आधार कार्ड मिळून आले असून त्यांचा मुद्देमाल त्यांना मिळून आल्याने सदरची हॅन्डबॅग त्यांच्या ताब्यात कर्तव्यावर असलेल्या पोलीस उपनिरीक्षक प्रियांका शिंदे यांच्या उपस्थितीत देण्यात आली.
Tags
पनवेल