*रिक्षा मध्ये राहिलेली बॅग इसमाला करण्यात आली परत*





पनवेल दि.१९(संजय कदम): पनवेल रेल्वे स्टेशन येथे एका इसमाची रिक्षामध्ये बॅग विसरली होती. ती बॅग या इसमाला पनवेल शहर पोलिसांनी परत केली आहे.


       सदरचा इसम पोलीस ठाणे येथे आल्यानंतर सदर रिक्षाचा सीसीटीव्ही फुटेज द्वारे पनवेल शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे शाखा पथकाचे अंमलदार एच सी वायकर व पोलीस हवालदार महेश पाटील यांनी सीसीटीव्ही फुटेजद्वारे रिक्षाचा शोध घेऊन सदरची बॅग शोधून दिली व ती सदर प्रवाशाची खात्री करून त्यांचे ताब्यात देण्यात आली आहे.


थोडे नवीन जरा जुने