पनवेल दि.२०(संजय कदम): आम्हाला गर्व हिंदुत्वचा ग्रुप तर्फे हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथी निमित्ताने ईरसाळवाडी येथे आदिवासी बांधवाना विविध वस्तूंचे वाटप नुकतेच करण्यात आले.
आम्हाला गर्व हिंदुत्वचा व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेनापक्ष प्रमुख, महाराष्ट्र राज्याचे मा मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेने एक कट्टर शिवसैनिकांचा संपूर्ण महाराट्राचा ग्रुप सामाजिक उपक्रम राबवत कार्यरत आहे, त्याचाच एक भाग म्हणून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथी निमित्ताने नैसर्गिक आपत्तीग्रस्त गाव ईसालवाडी येथे २१ वा सामाजिक उपक्रम राबवण्यात आला.
Tags
पनवेल