पनवेल दि.०२(वार्ताहर) चेंबूर येथे जाण्याच्या बहाण्याने टॅक्सी चालकाचा मोबाईल खेचून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या तिघांपैकी एकाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. सिद्धेश्वर गजें (२३) असे या आरोपीचे नाव असून पनवेल शहर पोलिस त्याच्या इतर दोघा सहकाऱ्यांचा शोध घेत आहेत.
कळंबोली येथे राहणारे सिद्धेश्वर गजें, त्याचे सहकारी अक्षय गुंड (२६) व सागर गर्जे (२१) तिघेही मोटारसायकलवरून फिरत होते. यावेळी पनवेलमधील ओरियन मॉलसमोरील बाजूला एक ओलाचालक कारमध्ये झोपल्याचे निदर्शनास आल्यानंतर या त्रिकुटाने संतू घोष (४०) याला चेंबूर येथे जाण्याच्या बहाण्याने उठवले.
त्यानंतर एकाने कारमध्ये बसण्याचा बहाणा केला. त्यानंतर त्याने संधी साधून ओला चालकाचा २० हजार रुपये किमतीचा मोबाईल खेचून स्कुटीवरून सहकाऱ्यांसह पलायन केले. यावेळी संतू घोष याने लुटारूंचा कारने पाठलाग करून त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने पळ काढल्याने घोष याने आरडाओरड केल्याने तिघांपैकी एकाला पकडण्यात यश आले.
Tags
पनवेल