पनवेल दि.०२(संजय कदम): आरजीओआय रोलर स्केटिंग जिल्हा चॅम्पियनशिप २०२३-२४ या स्पर्धेत सुनावले मधील खेळाडूंनी दैदीप्यमान यश मिळवले आहे.
ऐरोली येथे झालेल्या या स्पर्धेत पनवेल मधली T 75 रोलर स्केटिंगक्लब चे तुर्या प्रणाली नाईक ,मेधांश नवनाथ दाते, विनित विशाल जाधव, आशिता वालावलकर, आहना सोळंकी यांनी 2 गोल्ड, 2 सिल्वर आणि 8 ब्रॉन्झ मेडल पटकावले आहे. त्याच्या या कॅम्ह्कदार कामगिरीमुळे त्यांची स्टेट स्केटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत रायगड कडून निवड झालीआहे. या खेळाडूंना रायगड भूषण आणि महाराष्ट्र टीमचे कर्णधार प्रसाद महेश ढवळे हे प्रशिक्षक देत आहेत.
Tags
पनवेल