मुंबई ऊर्जा प्रकल्पाविरोधात महाविकास आघाडीच्या नेत्यांसह प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या सदस्यांनी घेतली महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांची भेट



 दि.२१ (संजय कदम) : पनवेल तालुक्यातील अनेक दिवसापासुन टेंभोडे, नेवाळी, वळवली, कोळवाडी, पडघे, पालेबुद्रुक, वलप आणि हेदूडणे या ८ गावांचा मुंबई ऊर्जा प्रकल्पासोबत चालू असलेल्या संघर्ष यशाच्या निर्णयात्मक टप्यात आला असल्याचे दिसून येत आहे.

 
आज मुंबई ऊर्जा प्रकल्पाविरोधात महाविकास आघाडीच्या नेत्यांसह प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या सदस्यांनी महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांची भेट घेतली असता भूमिपुत्रांना न्याय मिळवून देण्यासाठी लवकरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन सकारात्मक मार्ग काढण्याचे आश्वासन वड्डेटीवार यांनी प्रकल्पग्रस्तांना दिले. .



आज मुंबई ऊर्जा प्रकल्पा विरोधात महाविकास आघाडीच्या नेते व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे संपर्कप्रमुख बबनदादा पाटील, मा. आमदार बाळाराम पाटील, मा नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, काँग्रेस नेते आर. सी. घरत, काँग्रेस जिल्हाध्यक्ष, सूदाम पाटील, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष हेमराज म्हात्रे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे पनवेल महानगरप्रमुख एकनाथ म्हात्रे, टेंभोडे व वळवली प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीनेचे अध्यक्ष प्रकाश म्हात्रे, ॲड. विजय गडगे, मारूती चिखलेकर, ॲड. प्रशांत कड़व यांच्यासह प्रकल्पग्रस्तांनी आज महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेड्डीवार यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर मुंबई ऊर्जा प्रकल्पाच्या मनमानी कारभाराचा पाढा वाचला.
यासंदभार्त विरोधी पक्षनेते विजय वडेड्डीवार यांनी तात्काळ रायगड जिल्हाधिकारी डॉ योगेश म्हसे आणि मुंबई ऊर्जा विभागाचे अधिकारी यांच्याशी भ्रमणध्वनी द्वारे संपर्क साधून मुख्यमंत्री यांच्यासोबत या विषयासंदर्भात २-३ दिवसात बैठक होईपर्यन्त कामाची गती रोखून या ८ गावातीलशेतकऱ्यांच्या जमीनी वाचविणेच्या दृष्टिने डोंगराची जागा ही सदर प्रकल्पासाठी पर्यायी जागा म्हणून वापर करण्यात येऊ शकते का या विषयावर चर्चा केली. तसेच आम्ही महाविकास आघाडी नेहमीच भूमिपुत्रांच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली आहे व याविषयावर सुद्धा भूमिपुत्रांसोबत असल्याचे आश्वासन दिले. 
थोडे नवीन जरा जुने