ओवळे ग्रामपंचायत सरपंच रुपेश गायकवाड आणि उपसरपंच निलेश गायकवाड यांचे पारगावचे सरपंच अहिल्या बाळाराम नाईक यांनी केले अभिनंदन
पनवेल दि.२१ (संजय कदम) : नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत ओवळे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी रुपेश गायकवाड आणि उपसरपंचपदी निलेश गायकवाड यांची निवड झाल्याबद्दल पारगाव ग्रामपंचायतीचे सरपंच अहिल्या बाळाराम नाईक यांनी त्यांची भेट घेऊन त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
         यावेळी माजी सरपंच सौ निशा रत्नदीप पाटील, माजी उपसरपंच मनोज राम दळवी, समाजसेवक बाळासाहेब नाईक व भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष राकेश गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.


थोडे नवीन जरा जुने