वाशी येथील मिनी सी शोरच्या धर्तीवर कामोठे येथील खाडी किनाऱ्यांचा विकास करा शेतकरी कामगार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष अमोल शितोळे यांची मागणी




कामोठे शहरातील सेक्टर ३४, ३५ आणि ३६ हे खाडी किनारी आहेत. खाडी मध्ये भराव टाकून नमूद केलेल्या सेक्टर मध्ये इमारती बांधल्या आहेत. 
आजमितीस सिडको आणि पालिकेने या किनाऱ्यांकडे दुर्लक्ष केल्याने भरती आली कि खाडीचे पाणी इमारतींच्या संरक्षक भिंती पर्यत येते.


त्यात नवी मुंबई विमानतळाचे काम करताना खाडीत भराव टाकल्याने भविष्यात कामोठे मधील खाडी किनाऱ्यांना देखील धोका संभवतो. साप, विंचू सारखे विषारी प्राणी देखील इमारतींच्या आवारात आढळून येतात. भीतीने नागरिक लहान मुलांना इमारतीच्या आवारात खेळण्यासाठी पाठवत नाहीत.


खाडी पाण्यापासून बचाव व्हावा यासाठी सिडकोच्या नियोजनात किनाऱ्या रस्त्याचा प्रस्ताव आहे. पनवेल पालिकेने हार नियोजित रस्ता पूर्ण करून नवी मुंबई मधील सागर विहार - मिनी सी शोरच्या धर्तीवर विकास केल्यास कामोठे शहराच्याच नव्हे तर पनवेल महानगर पालिकेच्या नाव लौकिकात भर पडेल. तसेच कामोठेकरांना सकाळ - संध्याकाळ व्यायाम करण्यासाठी हक्काची जागा उपलब्ध होईल.
सिडकोने फायद्यासाठी कामोठेमध्ये इमारतींचे जंगल उभे केले. एकही उद्यान अथवा मैदान किंबहुना विरंगुळा केंद्र नाही. नागरिक सकाळी - संध्याकाळी रस्त्यांवर वाहने चुकवत व्यायाम करतात. सिडकोने दुर्लक्ष केले कमीत कमी पनवेल महापालिकेने तरी सेक्टर ३४, ३५ आणि ३६ येथील खाडी किनाऱ्यांचा योग्य विकास करून कामोठेच्या पर्यायाने पनवेलचे सौंदर्यात भर घालावी यासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून मिनी सी शोरच्या धर्तीवर कामोठे येथील खाडी किनाऱ्यांचा विकास करावा अशी मागणी केले असे कामोठे शहर अध्यक्ष अमोल शितोळे आणि कामोठे मुख्य संघटक अल्पेश माने यांनी दिली.



थोडे नवीन जरा जुने