पनवेल दि.२८(वार्ताहर): खारघर मध्ये सिडकोच्या अनधिकृत नियंत्रण बांधकाम विभागाच्या वतीने येथील सेक्टर 10 मधील निरसूख पॅलेस हॉटेलच्या अनधिकृत बांधकामावर आज कारवाई करण्यात आली आहे.
सिडकोच्या जागेवर विनापरवाना बांधकाम केल्याप्रकरणी हि कारवाई करण्यात आली. यावेळी सिडकोचे पथक पोलिसांचा मोठा फौजफाटा, जेसीबीच्या साहाय्याने घटनास्थळी दाखल झाले होते.
अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे अधिकारी लक्ष्मीकांत डावरे यांच्या मार्गदर्शनात हि कारवाई करण्यात आली. खारघर शहरात सिडकोच्या 48 पेक्षा जास्त भूखंडावर भूमाफियांनी कब्जा केला आहे. सिडकोची मोहीम थंडावल्याने शहरात अनधिकृत बांधकामांना पेव फुटले आहे. सिडकोने या कारवाईत सातत्यता ठेवण्याची मागणी होत आहे.
Tags
पनवेल