पनवेल दि.२८(संजय कदम): पनवेल मधील २ जलतरणपटूंनी विविध प्रकारांमध्ये पदके पटकावून पनवेलचे नाव उंचावले आहे.
रायगड जिल्ह्यातील दोन जलतरणपटू हसन शेख (वय: 25) आणि सनी राजेश टाक (वय: 28) यांनी येम्मकेरे येथे आयोजित कर्नाटक जलतरण संघटनेने आयोजित केलेल्या भारतीय जलतरण महासंघाने संलग्न असलेल्या 19 व्या राष्ट्रीय मास्टर्स चॅम्पियनशिप 2022-23 मध्ये भाग घेतला.
सदर स्पर्धा 24 ते 26 नोव्हेंबर 2023 दरम्यान जलतरण तलाव, मंगळुरु, कर्नाटक येथे संपन्न झाली. या स्पर्धेत हसन शेखने 100 मीटर बटरफ्लाय इव्हेंट आणि 4 x 50 मीटर फ्रीस्टाइल स्पर्धेत 2 सुवर्णपदके जिंकली आणि सनी राजेश टाकने 100 मीटर ब्रेस्टस्ट्रोक आणि 4 x 50 मीटर फ्रीस्टाइल रिले स्पर्धेत अनुक्रमे 1 कांस्य आणि 1 सुवर्णपदक जिंकले.त्यांच्या यशा बद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
Tags
पनवेल