पृथ्वीवरील अनेक संसाधनापैकी पाणी हे सर्वाधिक प्रमाणात उपलब्ध असलेले तसेच उत्पादन, कृषी आणि ऊर्जा निर्मिती सारख्या क्षेत्रांमधील औद्योगिक प्रक्रियांचा आधार स्तंभ असलेले एक संसाधन आहे. त्यामुळे तळोजातील दीपक फर्टिलायझर्स अँड पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेडने पाणी बचत व पाण्याच्या पुनर्वापराद्वारे शाश्वतेच्या दिशेने वाटचाल केली आहे.
पृथ्वीच्या पृष्ठभागाचा ७० टक्के भाग जरी पाण्याने व्यापलेला असला तरी औद्योगिक वापरासाठी सहजपणे उपलब्ध होणाऱ्या गोड्या पाण्याचे प्रमाण मात्र ३ टक्क्यांहूनही कमी आहे. जलसंपदा मंत्रालयाच्यामते, देशातील विविध औद्योगिकक्षेत्रांमध्ये जवळपास ४० अब्ज घनमीटर पाण्याचा वापर केला जातो ज्याचे प्रमाण एकूण उपलब्ध पाण्याच्या ६ टक्के इतके आहे. वाढत्या लोकसंख्ये बरोबर जागतिक स्तरावरील गोड्यापाण्याची मागणीही अधिकाधिक तीव्र होत चालली आहे व त्यामुळेच पाण्याच्या शाश्वत पुरवठ्यासाठी उद्योगांनी सक्रियपणे जलव्यवस्थापन करणे गरजेचे आहे. दीपक फर्टिलायझर्स अँड पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये विशेषत: येथील रासायनिक उत्पादन प्रक्रियांमध्ये पाण्याची भूमिका खूप महत्त्वाची आहे. कुलिंग, मिक्सिंग, वॉशिंग, हिटींग तसेच वाफ निर्मिती सारख्या आवश्यक उद्देशांसाठी पाणी एका अपरिहार्य संसाधनाच्या रूपात वापरले जाते. पाण्याचा हा बहुउद्देशीय उपयोग औद्योगिक उपक्रमांना टिकवून ठेवण्यात त्याचे असलेले महत्व रेखांकित करतो. म्हणूनच पाण्याचे हे महत्व ओळखूनच दीपक फर्टिलायझर्स सारख्या उद्योगांसाठी पाणी सरंक्षण आणि कपाती बाबतची धोरणे अंगिकारणे अनिवार्य ठरते. या जाणिवेतूनच दीपक फर्टिलायझर्स तळोजातील के१ - के६ विभागांनी वित्तीय वर्ष २०१९ पासून शाश्वत जल-व्यवस्थापन पद्धतींद्वारे गोड्या पाण्यावरील अवलंबित्व प्रतिदिन ७५० घनमीटरने इतके घटविलेले आहे.
एमआयडीसीच्या अखत्यारीत असलेल्या जलाशयातून दीपक फर्टिलायझर्सला पाण्याचा पुरवठा होतो. हा जलसाठा एमआयडीसीच्या जलसंवर्धन उपक्रमाचा एक भाग आहे जिथे पावसाळ्यात पावसाचे पाणी गोळा करून साठवले जाते. यामुळेच एमआयडीसीकडून पुरवठा होत असलेल्या पाण्याची गुणवत्ताही उपलब्ध होणाऱ्या उच्च-गुणवत्तेच्या पाण्यासारखीच असते. हे प्रक्रिया केलेले पाणी दीपक फर्टिलायझर्सच्या जलसुविधेअंतर्गत विविध साठवण टाक्यांमध्ये साठवले जाते. दीपक फर्टिलायझर्स तळोजाच्या–के १ विभागातील विविध उत्पादन प्रक्रियांसाठी उच्चत्तम गुणवत्तेचे पाणी आवश्यक असते ज्याचा उपयोग बाष्फके (बॉयलर्स), कंडेन्सर्स, चिलर्स, कूलिंग टॉवर सारख्या प्रक्रियांमध्ये केला जातो. उच्चत्तम दर्जाच्या पाण्याची गरजही दीपक फर्टिलायझर्समध्ये असलेल्या डिमिनरलायझेशन प्लांटच्या माध्यमातून पूर्ण केली जाते,परंतु पाण्यातील एकूण विरघळलेल्या घनपदार्थाची पातळी कमी करण्यासाठी बरेच पाणी खर्ची पडते. सन २०१९ पूर्वी, कच्चे पाणी केवळ प्रेशर सँडफिल्टरमध्ये गाळले जाऊन पुढे डिमिनरलायझेशन प्रक्रियेसाठी जात होते. पण विशिष्ट गुणवत्तेच्या डीएम पाण्याच्या निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात पाणी खर्ची पडत असल्यानेही प्रक्रिया कमी प्रभावी होते. २०१९ साली, डीएम प्लांटची पुर्वप्रक्रिया पद्धती सुधारण्यासाठी दोन नवीन प्रक्रिया सुविधा स्थापित केल्या गेल्या ज्यांच्या मार्फत पाणी गाळण्याची प्रक्रिया आता तीन टप्प्यांत होत आहे. या सर्व टप्प्यांमधून उत्सर्जित होत असलेले सांडपाणी पुनर्वापरासाठी ईटीपीकडे वळविले जाते त्यामुळे पाण्याची पुनर्प्राप्ती देखील वाढते. यू.एफ आणि आरओ प्रणालींच्या स्थापनेनंतर दीपक फर्टिलायझर्सने उपभोग्य पाण्याचा वापर प्रतिदिन ७५० घनमीटरने इतका यशस्वीपणे कमी केला असून त्यामुळे वर्षागणिक अंदाजे २५०,००० घनमीटर पाण्याची बचत झाली आहे. आय.आय.टी मुंबई येथील पर्यावरण अभियांत्रिकीच्या एका चमूने अलीकडेच केलेल्या अभ्यासादरम्यान या प्रकल्पाचे परीक्षण केल्यानंतर दीपक फर्टिलायझर्सने घेतलेल्या अविश्वसनीय प्रयत्नांची प्रशंसा केलेली आहे.
Tags
पनवेल