चांगू काना ठाकूर आर्टस् कॉमर्स अँड सायन्स कॉलेज नवीन पनवेल (स्वायत्त) येथे ७४ वा संविधान दिवस उत्साहात साजरा




जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्टस् , कॉमर्स  अँड सायन्स  कॉलेज न्यू पनवेल (स्वायत्तयेथे नॅशनल कॅडेटस् कौर (N.C.C.) विभागाच्या तर्फे  दिनांक २६ नोव्हेंबर २०२३ रोजी ७४ वा संविधान दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.या

 प्रसंगी  नॅशनल कॅडेटस् कौरच्या कॅडेट्स सर्व प्रथम सी .एस .एम .मयुरी पिसाळने प्रतिज्ञा घेतली व त्यानंतर सी.क्यू.एम.एस. आदित्य घवे ने   संविधानाच्या उद्देशिकेचे सर्वांकडून वाचन करून घेतले . तसेच कॅडेटस् प्रेम भोसले ने भारतीय संविधानाचा इतिहास , संविधानाचे महत्व, कॅडेटस् प्रतिज्ञा नाईक व कॅडेटस् सारण्या देवरे यांनी संविधानाची   प्रस्तावना, कॅडेटस् मिनिष चोरगे ने संपूर्ण संविधानाचा सार कॅडेटस् समोर ठेवला.

असोसिएट एन.सी.सी ऑफिसर मेजर प्रो. (डॉ). उद्धव भंडारे यांनी कॅडेटस्  ना भारतीय संविधाना मधील भारतीय नागरिकांचे मैलिक अधिकार  व त्यांची कर्तव्य समजावून सांगून मार्गदर्शन केले. तसेच भारतीय लोकशाहीचे तीन स्तंभ म्हणजे न्यायव्यवस्था, विधिमंडळ आणि कार्यपालिका याविषयी पण स्पष्टीकरण दिले. या कार्यक्रमासाठी एकूण ७३ एन .सी .सी. (N.C.C.) कॅडेट्सनी सहभाग घेतला 




या  कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो.(डॉ.)एसकेपाटील, आय.क्यू..सी.समन्वयक डॉ.बी.डी.आघाव, रुसा समन्वयक डॉ.एसएनवाजेकर यांनी कौतुक केलेतसेच महाविद्यालयातील सर्व विद्याशाखांचे प्रमुख, विविध विभागाचे प्रमुख आणि सर्व प्राध्यापक वर्गाने या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल शुभेच्छा दिल्या.  या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी असोसिएट एन. सी. सी. ऑफिसर मेजर प्रो. (डॉ.) उद्धव भंडारेरमाकांत नवघरे, ग्रंथपाल आणि कॅडेटस् यांनी अथक परिश्रम केले.

 हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माश्रीरामशेठ ठाकूर साहेबसंस्थेचे अध्यक्ष माश्रीअरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन माश्रीवायटीदेशमुख,पनवेलचे  माआमदार श्रीप्रशांत ठाकुर  संस्थेचे सचिव माडॉएसटीगडदे यांनी कौतुक केले. 

थोडे नवीन जरा जुने