खांदेश्वर दि. 29( 4K NEWS) कळंबोली वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक. हरिभाऊ बनकर तसेच सपोनि शिर्के ,पो.उपनिरीक्षक साठे व पोलीस अंमलदार असे खांदेश्वर रेल्वे स्टेशन येथे रिक्षा चालक-मालक तसेच टॅक्सी चालक व मालक यांना वाहतुकीच्या नियमाबाबत प्रबोधन देण्यात आल्या.
नो पार्किंग मध्ये गाड्या उभ्या न करणे, बस स्टैंड वर रिक्षा पार्क न करणे, सिग्नल जम्पिंग न करणे, गाडीचालवताना मोबाईल चा वापर न करणे, दारू पिऊन गाडी न चालवणे , प्रवाशांशी सौजन्याने वागणे, मीटर प्रमाणे भाडे आकारणी करणे, भाडे नाकारूनये,वाहनांची कागदपत्रे अद्यावत करणे, लेन कटिंग करू नये, स्वच्छ युनिफॉर्म परिधान करणे याबाबत प्रबोधन करून योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत.
सदर वेळी 25 ते 30 रिक्षा चालक व मालक हजर होते. तसेच सदर वेळी बरेचसे रेल्वे प्रवासी सुद्धा हजर होते.
Tags
पनवेल