बहुउद्देशीय मार्गिका ठरणार महाराष्ट्राची जीवन वाहिनी

वडोदरा मुंबई आणि अलिबाग विरार अशा दोन महत्त्वाकांशी कॉरिडोरच्या निर्मितीचा मार्ग मोकळा झालेला असून मुंबई महानगर प्राधिकरण विभागांमध्ये बहुउद्देशीय मार्गिका ही महाराष्ट्राची जीवन वाहिनी ठरणार आहे.


मार्च महिन्यामध्ये प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये अत्यंत महत्त्वाचा निर्णय पारित करण्यात आलेला असून त्यानुसार बहुउद्देशीय मार्गीकेच्या सोबतच महावितरण गॅस पाईप लाईन तसेच मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड यांची उच्च दाबाची विद्युत वाहिनी मार्गक्रमण करणार असल्याचे समजते. प्रस्तावित तीस मीटर रुंदीच्या बहुउद्देशीय कॉरिडोरच्या अनुषंगाने भूसंपादनाचे कार्य प्रगतीपथावर आहे. तूर्तास अस्तित्वात असणाऱ्या महानगर गॅस पाईपलाईनच्या उजवीकडे तीस मीटर रुंदीच्या भूभागामध्ये बहुउद्देशीय मार्गीका उभारण्यात येणार आहे.


थोडे नवीन जरा जुने