सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या जयंतीनिमीत्त नवीन पनवेल मध्ये रन फॉर युनिटी

सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या जयंतीनिमीत्त नवीन पनवेल मध्ये रन फॉर युनिटी
पनवेल दि.३१(वार्ताहर): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेने सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या जयंती निमीत्त जेष्ठ नागरिक संघ, नवीन पनवेल यांनी रण फॉर युनिटी हा उपक्रम उत्साहात साजरा केला.
       सकाळी साडेसात वाजता मिरवणुकीस सूरवात झाली, सर्व जेष्ठ नागरिक यात सहभागी झाले होते. मिरवणुकीची सांगता संघाच्या हॉल मध्ये झाली. या कार्यक्रमाला माजी नगरसेवक ॲड. मनोज भुजबळ यांनी उपस्थित राहून एकात्मता या विषयी मार्गदर्शन केले. तर संघाचे अध्यक्ष सूर्यकांत ओक यांनी सरदार वल्लभ भाईंबद्दल रोचक आणि खुमासदार माहिती दिली. तसेच नीला नलावडे, पांडे, व्यवहारे, वर्दंम, मुकादम, आहुजा, सिंग आणि ठाकरे यांनी वल्लभभाईंच्या हृद्य आठवणी सांगितल्या. यावेळी सर्वश्री साठे, प्रकाश पराडे, करपे, अरविंद केळकर, कांबळी, संध्या कोरडे ,सौ शोभा पराडे आणि सौ छाया देसाई यांनी सर्वसाधारण व्यवस्था सांभाळली. जेष्ठ नागरिक संघाच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल नवीन पनवेल मध्ये सर्वत्र कौतुक होत आहे


थोडे नवीन जरा जुने