पनवेल दि.०१(संजय कदम): पनवेल तालुक्यातील आगामी काळात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये शासनाने दिलेल्या मनाई आदेशाचे कोणीही उल्लंघन करू नये असे आवाहन पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी घेतलेलय बैठकीत केले.
ग्रामपंचायत निवडणुक अनुषंगाने पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीतील दापोली, ओवळे आणि गिरवले या ग्रामपंचायतींची निवडणूक दिनांक 05/11/2023 रोजी प्रस्तावित असून त्याअनुषंगाने आज गिरवले ग्रामपंचायत उमेदवार यांची ग्रामपंचायत कार्यालय येथे बैठक आयोजित करण्यात अली होती. बैठकीत उपस्थितांना आदर्श आचारसंहिता पालन करणे बाबत तसेच नवी मुंबई पोलीस आयुक्त यांच्या कार्यालयाकडील मनाई आदेशाचे उल्लंघन न करणे बाबत सुचित केले. सोशल मीडियाचे माध्यमातून कोणत्याही प्रकारे राजकीय, सामाजिक तेढ निर्माण होणार नाही याची दक्षता घेणे बाबत सुचित करून उपस्थितांना CRPC 149 अन्वये नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. या बैठकीसाठी पनवेल शहर पोलीस ठाण्याचे गोपनीय विभागाचे अधिकारी संजय धारेराव यांच्यासह 15 उमेदवार व प्रतिष्ठित नागरिक हजर होते.
Tags
पनवेल