संविधान दिनानिमित्त स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी केले अभिवादन






संविधान दिनानिमित्त स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी केले अभिवादन
पनवेल दि.२७(संजय कदम): स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी संविधान दिनाचे औचित्य साधून महाड येथील चवदार तळे येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे दर्शन घेऊन अभिवादन केले.  


            यावेळी समाधान कांबळे, मनोज कांबळे ,अमित कांबळे , अरुण जाधव ,अरुण धीवर भारत दाताड ,रमेश रुखवते आदी कार्यकर्ते उपस्थित होते. त्यानंतर महेश साळुंखे यांनी खेड येथे जाऊन रायगड जिल्हा कार्याध्यक्ष विजय धोत्रे यांच्या मुलीच्या लग्नाला उपस्थिती दर्शवली. त्याचप्रमाणे पक्षाचे संस्थापक अध्यक्ष मनोज भाई संसारे यांच्या मुलीच्या लग्नाला मुंबईत उपस्थित राहिले. पक्षाचे महाडचे तालुकाध्यक्ष सुजित जाधव यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली त्याला जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांनी मार्गदर्शन केले.


थोडे नवीन जरा जुने