बेकायदेशीरपणे भट्टी लावून गावठी हातभट्टीची दारू बनवणाऱ्यांवर पनवेल तालुका पोलिसांची धडक कारवाई




बेकायदेशीरपणे भट्टी लावून गावठी हातभट्टीची दारू बनवणाऱ्यांवर पनवेल तालुका पोलिसांची धडक कारवाई
पनवेल दि.०३(संजय कदम): हातभट्टीची दारू गाळण्याकरिता बेकायदेशीरपणे भट्टी लावून गावठी हातभट्टीची दारू तयार करणाऱ्यांवर पनवेल तालुका पोलिसांनी धडक कारवाई करून हातभट्टी उध्वस्त केली आहे. 



 तालुक्यातील दिघाटी गाव परिसरात बेकायदेशीरपणे भट्टी लावून गावठी हातभट्टीची दारू बनवली जात असल्याची माहिती पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक सचिन होळकर यांना गुप्त बातमीदाराद्वारे मिळताच त्यांनी त्वरित वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांच्याशी संपर्क साधला व त्यांना याबाबतची माहिती दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हर्षल राजपूत, पोलीस हवालदार सतीश तांडेल, पोलीस हवालदार तुकाराम भोये,खताळ आदींच्या पथकाणे त्याठिकाणी छापा मारला व तेथे असलेली दारू बनव्यासाठी लागणारी कच्ची रसायने, प्लास्टिकचे ड्रम, मोठी विविध प्रकारची पातेली, गॅस सिलेंडर टाकी, शेगडी, गॅस चे पाईप असा मिळून जवळपास २३ हजार ५०० ऊपये किमतीसह मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस हवालदार सतीश तांडेल करीत आहेत.


थोडे नवीन जरा जुने