रेशनकार्डधारकांना दिवाळीचा आनंदाचा शिधा वाटप करण्याची शिवसेनेची तहसीलदारांकडे मागणी





रेशनकार्डधारकांना दिवाळीचा आनंदाचा शिधा वाटप करण्याची शिवसेनेची तहसीलदारांकडे मागणी
पनवेल दि.०३(संजय कदम): रेशनकार्डधारकांना दिवाळीचा आनंदाचा शिधा वाटप शासनाच्या पिशवीत वाटप करण्याबाबत व अन्न पुरवठा (रेशनिंग दुकाने) ही सकाळी व संध्याकाळी चालू ठेवण्याबाबतची मागणी शिवसेनेच्या वतीने तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे




      पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील अन्न पुरवठा (रेशनिंग दुकाने) ही सकाळी एक वेळ चालू असतात. त्यामुळे सदरचे अन्न पुरवठा (रेशनिंग दुकाने) हे सकाळ व संध्याकाळ पर्यंत चालू ठेवण्यात यावेत, तसेच पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील काही व्यक्ती हे कामा निमित्त सकाळीच बाहेर जात असतात, व संध्याकाळी ५ ते ७ वाजेपर्यंत घरी परतात त्यामध्ये काही सफाई कामागार, घरेलू कामगार व इतर गरीब वर्ग हे रोजंदारीसाठी सकाळीच ७ वाजता बाहेर पडतात,




 त्यामुळे त्यांना रेशनिंग घ्यायला वेळ मिळत नाही, त्यामुळे सकाळ व संध्याकाळ या दोन्ही वेळसे अन्न पुरवठा (रेशनिंग दुकाने) ही चालू ठेवावी तसेच गणपतीमध्ये जो आनंदाचा शिधा वाटप केला होता, ती शासनाच्या पिशवीमध्ये वाटप केलेला नाही, तरी रेशनकार्डधारकांना जो शासनाने दिलेला दिवाळीचा आनंदाचा शिक्षा आहे तो शासनाच्या पिशवीमध्ये देवून वाटप करावे अशी मागणी तहसीलदार विजय पाटील यांच्याकडे शिवसेना पनवेल तालुका प्रमुख भरत जाधव यांनी निवेदनाद्वारे केली आहे.


थोडे नवीन जरा जुने