*सराईत २ मोटारसायकल चोरांना गुन्हे शाखेने केले गजाआड; ०६ गुन्हयांची उकल करून ०७ मोटरसायकल मिळून एकुण २ लाख ७५ हजार रुपये किमंतीचा मुद्देमाल हस्तगत*
पनवेल दि.०८(संजय कदम): दोन सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखेने गजाआड केले असून त्यांच्या कडून ६ गुन्ह्यांची उकल करून एकूण ७ मोटारसायकली ज्याची किंमत जवळपास २ लाख ७५ हजार आहे हा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
खारघर पोलीस ठाण्यात मोटारसायकल चोरीचा गुन्हा दाखल झाला असताना सदर गुन्हयाचा समांतर तपास गुन्हे शाखा करीत असताना गुन्हयातील घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल तांत्रिक विश्लेषण व बातमीदार यांचे आधारे या गुन्हयातील आरोपी रमेश लक्ष्मण कडाळी( वय २५) मु. पो. वारंघुशी, ता. अकोले जि. अहमदनगर व हर्षल काशिनाथ घाणे (वय २२) रा सी बी डी बेलापुर यांचा शोध घेतला असता सदर आरोपी बेलापुर रेल्वे स्टेशन पार्किंग येथे असल्याचे समजल्याने पोलिसांच्या पथकाने सापळा रचून त्यांना शिताफीने पकडण्यात आले तसेच त्यांचेकडून ०७ मोटार सायकल असा एकुण २,७५,००० /- रु. किंमतीच्या माल हस्तगत करण्यात आलेला आहे.
सदरची कामगिरी गुन्हा नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलींद भारंबे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), दिपक साकोरे, यांच्या सुचनांप्रमाणे पोलीस उप आयुक्त गुन्हे अमित काळे, व सहा. पोलीस आयुक्त गुन्हे गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वपोनि माणिक नलावडे, पोउपनिरी प्रताप देसाई, पोहवा प्रशांत काटकर, पोहवा ज्ञानेश्वर सांगळे, पोहवा किरण राऊत, पोहवा दुधाळ, पोना धनाजी भांगरे, पोना राहुल वाघ, पोशि लवकुश शिंगाडे, पोशि शुभांगी कोळी, चापोशि संदीप कोळी, चापोशि कैलास म्हात्रे यांनी केली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार प्रशांत काटकर हे करीत आहेत. या आरोपींकडून आत्तापर्यंत खारघर, कळंबोली, बेलापूर, कोळसेवाडी, कामोठे, खांदेश्वर या भागातून चोरलेल्या गाड्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.
Tags
पनवेल