मोबाइल खेचून चोरटे पसार
नवीन पनवेल उभ्या असलेल्या इसमाच्या हातातून मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी मोबाइल हिसकावला आहे. या प्रकरणी खारघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खारघर सेक्टर ३५ ई मधील गणेश शेरवई हे नेरुळ येथे काम करतात. सीआयएसएफ कॅम्पजवळील ओवेगाव, बस स्टॉप सेक्टर ३०, खारघर येथे टॅक्सीची वाट पाहत उभे होते. यावेळी बजाज पल्सर मोटारसायकलवरून आलेल्या दोन अनोळखी इसमांपैकी एकाने त्यांच्या हातातील मोबाइल जबरीने हिसकावून ते टाटा कॅन्सर हॉस्पिटलच्या दिशेने निघून गेले.
Tags
पनवेल