श्री स्वामी समर्थ दिपावली विशेषांकाचे स्वामी सेवकांच्या साक्षीने प्रकाशन

श्री स्वामी समर्थ दिपावली विशेषांकाचे स्वामी सेवकांच्या साक्षीने प्रकाशन
भक्तीच्या रसामध्ये श्री स्वामी समर्थ हे नाम सर्वश्रेष्ठ-मठाधिपती सुधाकरभाऊ घरत 
पनवेल दि.२४(वार्ताहर): भक्तीच्या रसामध्ये श्री स्वामी समर्थ हे नाम सर्वश्रेष्ठ असून आपण नामस्मरण करा स्वामी नेहमीच आपल्या पाठीशी उभे राहतात हा अनुभव भक्तांना नेहमीच येतो त्यामुळे स्वामी समर्थ नामाचा विसर पडू देऊ नका असे आवाहन पनवेल शहरातील श्री स्वामी समर्थ मठ मंदिरातील मठाधिपती सुधाकरभाऊ घरत यांनी श्री स्वामी समर्थ दिपावली विशेषांकाच्या प्रकाशनावेळी केले.               यावेळी मठाधिपती सुधाकरभाऊ घरत यांच्यासह स्वामी सेवक संजय कदम, प्रशांत शेडगे आदींसह मोठ्या प्रमाणात स्वामी भक्त यावेळी उपस्थित होते. गेल्या १९ वर्षांपासून श्री स्वामी समर्थ दिपावली विशेषांक हा सातत्याने काढला जात असून या अंकाद्वारे स्वामींच्याबाबत आलेले अनुभव, विचार व प्रसार केला जातो. त्यामुळे हा अंक दरवर्षी अति सुंदर बनत चालला असल्याचे त्यांनी सांगितले. स्वामींच्या जयघोषात शेकडो स्वामी सेवकांच्या साक्षीने याचे प्रकाशन करण्यात आले. 


थोडे नवीन जरा जुने