पनवेल, दि.16 (संजय कदम) ः पनवेल तालुक्यातील भाताणपाडा गावाजवळ आज सायंकाळी झालेल्या एका वाहनाला अपघातात 4 जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.
पुणे बाजूकडून गाडी क्र.एमएच-48-एसी-5766 ही मुंबई बाजूकडे जात असताना कि.मी.12/600 या ठिकाणी गाडी चालक श्रेयश वेताळ (23 रा.ठाणे) याचेे वाहनावरील नियंत्रण सुटून शोल्डर लेनचे रोलिंग तोडून त्याची गाडी उघड्या लँण्ड गार्डनमध्ये गेली व सदर गाडीला झालेल्या अपघातात
गाडीतील सचिन जाधव (25), पुजा राठोड (26), अपूर्वा राठोड (25) यांच्या हाता-पायाला, कमरेला व तोंडाला दुखापत झाली असून या चारही जखमींना आयआरबी रुग्णवाहिकेने पुढील उपचाराकरिता एम.जी.रुग्णालय कामोठे येथे दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची नोंद पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
Tags
पनवेल