मुंबई महानगर क्षेत्रातील एका डॉक्टराने ३०० रोबोटिक नी रिप्लेसमेंट सर्जरी करण्याची ही पहिलीच वेळ आहे
फोर्टिस हिरानंदानी हॉस्पिटलमधील ऑर्थोपेडिक स्पेशालिस्टने केल्या
१७ महिन्यांमध्ये २८७ यशस्वी रोबोटिक नी रिप्लेसमेंट सर्जरी
मुंबई महानगर क्षेत्रातील एका डॉक्टराने ३०० रोबोटिक नी रिप्लेसमेंट सर्जरी करण्याची ही पहिलीच वेळ आहे
नवी मुंबई : पनवेल दि.१२ डीसेंबर (4kNews)
फोर्टिस हिरानंदानी हॉस्पिटल वाशी येथील ऑर्थोपेडिक सर्जरीचे संचालक डॉ. प्रमोद भोर आणि त्यांच्या टीमने १७ महिन्यांमध्ये २८७ यशस्वी रोबोटिक नी रिप्लेसमेंट सर्जरी करण्याचा उल्लेखनीय टप्पा गाठला आहे. मुंबई महानगर क्षेत्रात पहिल्यांदाच ही उपलब्धी संपादित करण्यात आली आहे, ज्यामधून वैद्यकीय केअरमधील प्रगत रोबोटिक सर्जरी प्रकाशझोतात आली आहे.
मार्च २०२२ मध्ये सुरू झाल्यापासून फोर्टिस हिरानंदानी हॉस्पिटल वाशी येथील रोबोटिक नी रिप्लेसमेंट प्रोग्रामला भव्य यश मिळाले आहे. या प्रोग्राममुळे गुडघेदुखी व सांधेदुखीच्या समस्यांनी ग्रस्त अनेक रूग्णांचे जीवन सुधारले आहे. विविधता व कार्यक्षमता दाखवत या प्रोग्रामने विविध वयोगटांमधील रूग्णांचा जीवनाचा दर्जा सुधारला आहे.
रोबोटिक नी रिप्लेसमेंट सर्जरीचे प्रौढ व तरूण रूग्णांना मोठ्या प्रमाणात फायदे झाले असले तरी आघात किंवा रूमेटॉइड आर्थरायटिस (संधिवात) यामुळे सेकंडरी ऑस्टीओआर्थरायटिस झालेल्या तरूणांमध्ये या सर्जरीचा वापर मर्यादित आहे. फोर्टिस हिरानंदानी हॉस्पिटल वाशीची सीयूव्हीआयएस - सर्जिकल रोबोट सिस्टम या अत्याधुनिक पूर्णत: ऑटोमेटेड रोबोटिक आर्मने पूर्ण व अंशत: नी रिप्लेसमेंट सर्जरींमध्ये क्रांतिकारी बदल घडवून आणला आहे. अधिक अचूक व कमी इन्वेसिव्ह उपचारपद्धतीसह या तंत्रज्ञानामुळे रूग्ण गुडघ्याशी संबंधित समस्यांमधून लवकर बरे झले आहेत. या सिस्टमची अचूकता व किमान इन्वेसिव्ह स्वरूपामुळे रिकव्हरी कालावधीत ३० टक्के कपात झाली आहे, ज्यामुळे रूग्ण लवकरात लवकर त्यांचे दैनंदिन नित्यक्रम करू शकतात आणि रिकव्हरीसाठी लागणारा कालावधी पारंपारिक शस्त्रक्रिया पद्धतींच्या तुलनेत अर्ध्यापर्यंत कमी होतो.
पारंपारिक नी रिप्लेसमेंट सर्जरीमध्ये हाताने उपकरणांची हाताळणी करावी लागत असल्यामुळे मर्यादा येऊ शकतात, कधी-कधी सर्जन्सना अधिक हाडे कट करावी लागतात, ज्यामुळे ऊतींचे नुकसान होऊ शकते. याउलट सीयूव्हीआयएस - सर्जिकल रोबोट सिस्टम अचूक व किमान इन्वेसिव्ह उपचारपद्धतीची खात्री देते.
फोर्टिस हिरानंदानी हॉस्पिटल, वाशी येथील ऑर्थोपेडिक सर्जरीचे संचालक डॉ. प्रमोद भोर तंत्रज्ञानामधील सुधारणांना दाखवत म्हणाले, हे तंत्रज्ञान आम्हाला सर्वोत्तमपणे नियोजन करण्यास मदत करते आणि हातापायांचे सीटी स्कॅन्स एकूण शरीररचना समजण्यास मदत करते. आम्ही या स्कॅन्सचा वापर करत व्हर्च्युअल सर्जरीचे, तसेच इम्पाण्ट प्लेसमेंट व बोन कट्सचे नियोजन करतो. पूर्णत: ऑटोमॅटिक रोबो हाडांमधील ऊतींचे बारकाईने कटिंग करण्यामध्ये मदत करतो, तसेच सांध्यामध्ये इम्प्लाण्ट परिपूर्णपणे फिट करण्यामध्ये देखील मदत करतो. या उपचारपद्धतीमुळे रक्त संक्रमणाची गरज कमी होते आणि शस्त्रक्रियेनंतर वेदना देखील होत नाहीत. रूग्ण माहिती व सपोर्टचे महत्त्व समजून घेत फोर्टिस हिरानंदानी हॉस्पिटल संभाव्य रूग्ण आणि त्यांच्या ऑर्थो जॉइण्ट सपोर्ट ग्रुपच्या माध्यमातून सर्जरी रूग्ण यांच्यामधील संपर्क सुलभ करते. हा उपक्रम रूग्ण व त्यांच्या कुटुंबियांना शस्त्रक्रियेसाठी तयार करण्यामध्ये, समस्यांचे निराकरण करण्यामध्ये आणि उपचारासंदर्भात विश्वास निर्माण करण्यामध्ये महत्त्वाचा राहिला आहे.
या उपलब्धीबाबत मत व्यक्त करत फोर्टिस हिरानंदानी हॉस्पिटल, वाशी येथील फॅसिलिटी डायरेक्टर नितीन कमारिया म्हणाले, ''आमचा प्रोग्राम 'प्रीसीशन मीट्स प्रीझर्व्हेशन' म्हणजेच अचूकतेमुळे योग्य संरक्षण मिळण्याचे परिपूर्ण उदाहरण आहे. आम्हाला या प्रभावी उपलब्धीचा अभिमान वाटतो, ज्यामुळे हाडे व सांध्यांच्या समस्यांनी पीडित रूग्णांचा जीवनाचा दर्जा सुधारण्यास मदत होते. रूग्णांप्रती आमची कटिबद्धता आमच्या क्लिनिकल टीम्सना अपवादात्मक केअर व निष्पत्ती प्रदान करण्यास सक्षम करते. असेही त्यांनी यावेळी सांगितले.
Tags
पनवेल