पनवेल : दि.१२ डिसेंबर (4K News)श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यंदाही आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेच्या महाअंतिम फेरीला आज पनवेलमध्ये शानदार सुरुवात झाली.
पनवेल येथील आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात पार पडत असलेल्या या महाअंतिम फेरीचे उद्घाटन अभिनेते लेखक व दिग्दर्शक संजय मोने, सुप्रसिद्ध अभिनेते विजय पाटकर, लेखक व दिग्दर्शक राजन ताम्हाणे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा उपाध्यक्ष व अटल करंडक स्पर्धा प्रमुख परेश ठाकूर, पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, भाजपचे उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, माजी नगरसेवक राजू सोनी, माजी नगरसेविका दर्शना भोईर, रुचिता लोंढे, सुप्रसिद्ध अभिनेते भरत सावले, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा प्रमुख कार्यवाह श्यामनाथ पुंडे, सांस्कृतिक सेलचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन, स्मिता गांधी, गणेश जगताप, चिन्मय समेळ, प्रीतम म्हात्रे, युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष सुमित झुंझारराव आदी उपस्थित होते.
यंदा या स्पर्धेचे दहावे वर्ष असून रविवार पर्यंत चालणाऱ्या या अंतिम फेरीत राज्यभरातून १२० पैकी २५ निवड झालेल्या एकांकिकांचे सादरीकरण होत आहे. या स्पर्धेतील विजेत्या एकांकिकेला एक लाख रुपये आणि मानाचा अटल करंडक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे इतरही पारितोषिके आहेत, तर यंदाच्या गौरव रंगभूमी पुरस्काराने ज्येष्ठ रंगकर्मी पद्मश्री डॉ. मोहन आगाशे यांना पारितोषिक वितरण समारंभावेळी सन्मानित करण्यात येणार आहे.
दिनांक ०९ डिसेंबरला मराठवाडा मित्रमंडळाचे वाणिज्य महाविद्यालय पुणे (सिनेमा), प्रताप महाविद्यालय अमळनेर (तो, पाऊस आणि टाफेटा), बॅकस्टेज वाला ग्रुप पनवेल (आऊट बर्स्ट), कलाकार मंडळी पुणे (चाहुल), ढ मंडळी कुडाळ (ढीम टँग, ढीटँग), कलांश थिएटर मुंबई (जिन्याखालची खोली), नटवर्य रंगमंच विरार (नारायणास्त्र), केईएस कॉलेज मुंबई (अलॉव मी), निर्मिती वसई (अम्मा), नाट्यस्पर्श आणि भवन्स कॉलेज, अंधेरी (टोपरं) तर दिनांक १० डिसेंबरला रंगसंगती मुंबई (सुमित्रा), एम.डी. कॉलेज मुंबई (पुंडलिका भेटी), खालसा महाविद्यालय, मुंबई (लोकल पार्लर), रेवन एंटरटेंमेंट, पुणे (हॅलो इन्स्पेक्टर), सीकेटी महाविद्यालय (स्वायत्त) नवीन पनवेल (काक्षी), ज्ञानसाधना महाविद्यालय ठाणे (उणिवांची गोष्ट) या एकांकिका सादर हहोणार आहेत.
Tags
पनवेल