वीर सावरकरांचा अपमान; काँग्रेसच्या प्रियांक खर्गे विरुद्ध पनवेलमध्ये तीव्र आंदोलन
भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या नेतृत्वखाली झालेल्या आंदोलनातून वीर सावरकर यांच्याबद्दल अवमानकरक विधान करणाऱ्या प्रियांक खर्गेचा प्रतिकृती पुतळा जाळण्यात आला.
देशसेवेसाठी आपले आयुष्य अर्पण करणा-या स्वातंत्र्यवीर सारवाराकंचा अपपान कदापी सहन करणार नाही असे प्रतिपादन करून भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी काँग्रेसचे प्रियांक मल्लिकार्जुन खर्गे यांच्या पुतळ्याला जोडे मारुन निषेध व्यक्त केला तसेच उद्धव ठाकरे या अपमानजनक वक्तव्याचा निषेध करत काँग्रेसला जाब विचारणार का?, ज्या पद्धतीने भाजप रस्त्यावर उतरून आंदोलन करून काँग्रेसचा निषेध करणार आहे त्या पद्धतीने उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचा पक्ष काँग्रेसला रस्त्यावर उतरून विरोध करणार का? असा प्रश्न उपस्थित केला.
स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल काँग्रेसचे प्रियांक मल्लिकार्जुन खर्गे यांनी आक्षेपार्ह विधान केले आहे. याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी पनवेलच्यावतीने शुक्रवारी खर्गे यांच्या पुतळ्याला जोडे मारो आंदोलन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.
यावेळी यावेळी फलक आणि पोस्टर घेऊन काँग्रेस विरोधात घोषणा देत प्रियांग खर्गे यांच्या पुतळ्याला आणि प्रतीमेला जोडे मारण्यात आले. यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, सरचिटणीस नितीन पाटील, चारुशीला घरत, भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, सुनील घरत, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष राजेश गायकर, जय भारतीय जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र घरत, माजी नगरसेवक एकनाथ गायकवाड, महिला मोर्चाच्या पनवेल शहर अध्यक्षा राजश्री वावेकर, माजी नगरसेविका दर्शना भोईर, अॅडव्होकेट वृषाली वाघमारे, रुचिता लोंढे,भाजपचे पळस्पे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, मोतीलाल कोळी, रवी नाईक, भीमराव पोवार, उपाध्यक्ष प्रीतम म्हात्रे, केदार भगत,शहर चिटणीस रुपेश नागवेकर, युवा मोर्चा शहर अध्यक्ष सुमित झुंजारराव, युवानेते प्रतीक बहिरा, सोशल मीडिया सेल शहर संयोजक प्रसाद हनुमंते, प्रभाग १८ चे अध्यक्ष महेश सरदेसाई, अक्षय सिंग, प्रवीण मोरबाळे, रोशन ठाकूर, सुनीता गुरव, शांताराम महाडिक, दिनेश धवळे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान खारघर येथेही अध्यक्ष प्रविण पाटील यांच्या अध्यक्षतेखालीही जोडे मारो आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी भाजपनेते ब्रिजेश पटेल, माजी नगरसेवक अभिमन्यू पाटील, नरेश ठाकूर, किरण पाटील, गीता चौधरी, समीर कदम, अमर उपाध्याय, वासुदेव पाटील यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
Tags
पनवेल