*शेतकऱ्यांच्या मुळावर येणारी आणि आधुनिक भांडवलशाही निर्माण करणारी नैना ही शासनाने रद्द केलीच पाहिजे - विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे*




शेतकऱ्यांच्या मुळावर येणारी आणि आधुनिक भांडवलशाही निर्माण करणारी नैना ही शासनाने रद्द केलीच पाहिजे - विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे*
पनवेल दि.१४(4kNews): पनवेल तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मुळावर येणारी आणि आधुनिक भांडवलशाही निर्माण करणारी नैना ही शासनाने रद्द केलीच पाहिजे अशी खणखणीत मागणी महाराष्टराचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी हिवाळी अधिवेशनात आज शेतकऱ्यांच्यावतीनेबाजू मांडताना केली. 


            भूमिपुत्रांच्या पाठीशी महाविकास आघाडी पहिल्या दिवसापासून ठामपणे उभी असून यासंदर्भात शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख बबनदादा पाटील व जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे याना पत्र लिहून पनवेल तालुक्यात नैना प्रकल्पग्रस्त कमिटीने ५ डिसेंबर पासून तुरमाळे फाटा, मुंबई-गोवा महामार्ग येथे प्राणांकीत उपोषण सुरू आहे. या उपोषणास माजी केंद्रीय मंत्री तथा शिवसेना नेते अनंत गीते यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्यावतीने उपोषणास जाहीर पाठिंबा दर्शविला आहे. आपल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कार्यकर्ते सदर उपोषणास हजर व सहभागी आहेत, तसेच सदर उपोषण हे संपूर्ण महाविकास आघाडी मिळून करत आहे. मागील काही दिवसापूर्वी आपण या विषयी प्रत्यक्ष या विभागात शिवसेना जिल्हाप्रमुखांसोबत व महाविकास आघाडी नेत्यांसोबत दौरा केला होता


Hii

. प्रांत अधीकारी राहुल मुंडके व सिडको वरिष्ठ अधिकारी याच्या समवेत बैठक घेतली होती, तरी नैना प्रकल्प रद्द करून "एकत्रीकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली" (यूडीसीपीआर) लागू करणे व इतर मागण्याकरिता हे उपोषण सुरू आहे. सदर बाब लक्षात घेता आपण या सर्व विषयाचा विचार विनिमय करून योग्य न्याय मिळवून देण्यासाठी शासन दरबारी आंदोलनकर्त्यांची बाजू मांडावी अशी ही मागणी पत्राद्वारे केली होती. या मागणीनुसार विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी शेतकऱ्यांची बाजू अधिवेशनात मांडताना सांगितले की, मनमानी पदतीने नैना प्रकल्पाचे काम चालू आहे आणि इथल्या सगळ्या शेतकऱ्यांची भावना आहे की हा प्रकल्प कोणत्याही प्रकारे होऊ नये बाकी याच्यात कोणते नियम कोणतेही कायदे कोणते प्रलोभन यांच्यात आवश्यकता नाही. त्याच्या शेतकऱ्यांचा आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर होतोय परंतु आधुनिक भांडवलदारी ही भांडवलदारीची पद्धत आणि सरकार निर्माण करू पाहता की काय अशा प्रकारचा प्रश्न आहे.



 नैना प्रकल्प रद्द झाला पाहिजे अशा प्रकारची भूमिका येथील जनतेची आहे आणि म्हणून हा नैना प्रकल्प या भागातील जनतेच्या शेतकऱ्याच्या विरोधात आहे. शेतकऱ्यांना आर्थिक विवंचनेच्या खाईमध्ये लोटणार आहे, काही बिल्डरांना प्रोत्साहन देणारा आहे, शेतकऱ्याच्या मुळावर येणारी योजना आधुनिक भांडवलशाही निर्माण करणारी आहे त्यामुळे ही योजना रद्द झाली पाहिजे असे आवाहन सुद्धा शासनाला दानवे यांनी केले आहे. आजचा आंदोलनाचा नववा दिवस असून, शासनाचे लिखित स्वरूपात कोणतेही ठोस आश्वासन येत नाहो तो पर्यंत हा लढा पूर्ण निर्धाराने लढण्याचा निश्चय आंदोलन कर्त्यांनी केला आहे व याला परिसरातील ग्रामस्थांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. 


थोडे नवीन जरा जुने