खारघर रेल्वे स्टेशन ते मानसरोवर रेल्वे स्टेशन दरम्यान आढळला मृतदेह

              

  पनवेल : दि.१८ डिसेंबर (4K News)  खारघर रेल्वे स्टेशन ते मानसरोवर रेल्वे स्टेशन दरम्यान एका इसमाचा मृतदेह आढळला असून त्याच्या नातेवाईकांचा शोध पनवेल रेल्वे पोलीस करीत आहेत.


खारघर रेल्वे स्टेशन ते मानसरोवर रेल्वे स्टेशन दरम्यान कि. मी नंबर ४१/२२७ ते ४१ / २२९ च्या जवळ एका अज्ञात इसमाला लोकल गाडीची ठोकर बसून त्यात तो गंभीररीत्या जखमी होऊन मयत झाला आहे.



 सदर इसमाचे अंदाजे वय पन्नास वर्ष, उंची पाच फूट तीन इंच, अंगाने सडपातळ, रंगाने निमगोरा, चेहरा उभट, नाक सरळ, केस काळे व पांढरे, दाढी वाढलेली असून उजव्या हातावर मराठीत शंकर असे गोंदलेले तसेच उजव्या छातीच्या बाजूस साई असे मराठीत गोंदलेले आहे. त्याच्या अंगात फुल बाह्याचा लाल व पांढरा पट्टा असलेला टीशर्ट तसेच राखाडी रंगाची हाफ बर्मोडा घातलेली आहे. या इस्माबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्याने पनवेल रेल्वे पोलीस ठाणे फोन नंबर - ०२२ -२२२७४६७१किंवा सहा पोलीस निरीक्षक पी.एम. कांबळे 


थोडे नवीन जरा जुने