रोटरीच्या पनवेल फेस्टिवल ला मनसेचा मराठी दणका

                      

पनवेल दि.१८ डिसेंबर (4K News) रोटरीच्या पनवेल फेस्टिवल ला मनसेचा मराठी दणका रोटरी क्लब ऑफ पनवेल दरवर्षीप्रमाणे पनवेल फेस्टिव्हल चे आयोजन करत असते.
यंदाही या फेस्टिव्हल चे आयोजन करण्यात आले आहे.पण त्याच्या जाहिरातीचे फलक मात्र इंग्रजीत छापून शहरभर लावण्यात आले.
               काही वर्षापूर्वी देखील असाच प्रकार घडला होता तेव्हाही मनसेने पनवेल महोत्सव असा उल्लेख करण्यास भाग पाडले होते. 


यंदाही मनसेचे शहर विभाग अध्यक्ष संदीप पाटील,वाहतूक सेनेचे सहचिटणीस मंदार पाटणकर, सचिन सिलकर,आकाश घाटे यांनी रोटरीचे पिंपळकर यांच्याशी चर्चा करून चूक निदर्शनास आणून दिली.त्यांनीही चूक मान्य करत मराठी भाषेत जाहिरातीचे फलक तसेच अन्य बाबी मराठीत प्रसिद्ध करण्याचे आश्वासन दिले.


 

 
थोडे नवीन जरा जुने