आण्णासाहेब देशमुख स्मृतीप्रित्यर्थ वत्कृत्व स्पर्धा

                      

पनवेल: दि.१८ डिसेंबर (4K News) खालापूर पंचायत समितीचे पहिले माजी सभापती व विद्याप्रसारणी सभा चौकचे माजी अध्यक्ष यशवंतराव आनंदराव उर्फ आण्णासाहेब देशमुख यांच्या ३३ व्या स्मृतीदिनप्रित्यर्थ खालापूर तालुक्यातील माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांकरीता सरनोबत नेताजी पालकर विद्यामंदिर चौक येथे बुधवार दि. २० डिसेंबर रोजी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 

सकाळी ९.३० वाजता आण्णासाहेब देशमुख स्मृती समितीचे ज्येष्ठ सदस्य मोहन माने यांच्या उ‌द्घाटन होणार असून सायंकाळी ४ वाजता संस्कृतचे वरिष्ठ संशोधक व महाराष्ट्र राज्य विश्वकोश महामंडळाचे सदस्य हेमंत राजोपाध्ये यांच्या हस्ते संपन्न होणार आहे, अशी माहिती समितीच्या अध्यक्षा शोभा अविनाश देशमुखख व संयोजक प्रा. बादशहा भोमले यांनी दिली आहे. 


थोडे नवीन जरा जुने