रविवारी पनवेलमध्ये नृत्यवर्षा


                                 

पनवेल   पनवेल: दि.१८ डिसेंबर (4K News)नृत्यआराधना कलानिकेतन पनवेल या नामांकित नृत्य संस्थेच्या वतीने रविवार दिनांक १७ डिसेंबर रोजी 'नृत्यवर्षा' या भरतनाट्यम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 





        पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सकाळी १०. ३० वाजता हा नृत्याविष्काराचा कार्यक्रम होणार असून स्वरदा भावे या 'शडरिपू' तर नृत्यआराधना कलानिकेतन संस्थेच्या विद्यार्थिनी 'मार्गम' प्रकारातील नृत्य सादर करणार आहेत. 





यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून गुरु डॉ. स्वाती दातार यांची आशीर्वादपर उपस्थिती लाभणार आहे. विद्यार्थिनींना रंगमंचाचा अनुभव मिळण्यासाठी नृत्यआराधना कलानिकेतन संस्थेतर्फे वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये मुलींना सहभागी केले जाते. या संस्थेच्या माध्यमातून शेकडो विद्यार्थिनी प्रशिक्षित झाले असून त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कार व बहुमान मिळविले आहे. त्यामुळे दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या या 'नृत्यवर्षा' कार्यक्रमाला विशेष महत्व आहे. त्या अनुषंगाने या कार्यक्रमाचा रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अँड. दिपिका सराफ व अमिता सराफ यांनी केले आहे.


थोडे नवीन जरा जुने