हेल्मेट वाटपाचा कार्यक्रम संपन्न
पनवेल: दि.१८ डिसेंबर (4K News) जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, न्यू पनवेल (स्वायत्त) येथे आजीवन अध्ययन व विस्तार विभाग व युनायटेड वे मुंबई यांनी दिलेल्या हेल्मेटचे वाटप १६-१२-२०२३ रोजी करण्यात आले.
या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो.(डॉ.)एस. के. पाटील आणि मुंबई विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या कार्यक्रमाचे क्षेत्र समन्वयक, प्रा. डॉ. बी. एस. पाटील यांनी आजीवन अध्यन व विस्तार विभागाच्या एकूण ९० विद्यार्थ्याना हेल्मेट वाटप केले.
या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल महाविद्यालयाचे आय.क्यू.ए.सी.समन्वयक डॉ.बी.डी.आघाव, यांनी कौतुक केले. तसेच महाविद्यालयातील सर्व विद्याशाखांचे प्रमुख, विविध विभागाचे प्रमुख आणि सर्व प्राध्यापक वर्गाने या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी (डॉ). के. बी. ढोरे , प्रा. एच.एस खरात, प्रा अतुल घाडगे, प्रा. पूनम शिंदे यांनी अथक परिश्रम घेतले.
हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन मा. श्री. रामशेठ ठाकूर साहेब, संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन मा. श्री. वाय. टी. देशमुख,पनवेलचे मा. आमदार श्री. प्रशांत ठाकुर व संस्थेचे सचिव मा. डॉ. एस. टी. गडदे यांनी कौतुक केले.
Tags
पनवेल