आमदार प्रशांत ठाकूर व त्यांच्या पत्नी वर्षा ठाकूर यांचा अवयव दान संकल्प



पनवेल: दि. 6 डिसेंबर (4K News) ठाकूर दाम्पत्याकडून सरकारी अभियानात ऑनलाईन नोंदणी; इतर लोकप्रतिनिधींनी समोर ठेवला आदर्श वस्तुपाठ
 हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे, हे सिद्ध करणारी कृती म्हणजे अवयव दान. याच भावनेतून पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर आणि त्यांच्या पत्नी वर्षा ठाकूर यांनी म्हणून मरणोत्तर अवयव दानाचा संकल्प केला. त्यांनी केंद्र सरकारच्या अभियानामध्ये ऑनलाइन नोंदणी करून एक आदर्श वस्तुपाठ ठेवला. त्याचबरोबर इतरांना सुद्धा अशाच प्रकारे अवयवदानाबाबत त्यांनी आवाहन केले. 


        मृत्यु हे आपल्या आयुष्यातील चिरंतन सत्य आहे, जे कधीही बदलता येऊ शकत नाही. त्या अनुषंगाने आपण समाजातील अनेक गरजूंच्या आयुष्यात आनंद फुलवून त्यांचे जीवन प्रकाशमय करु शकतो. याची जाणीव फारच कमी लोकांना आहे. शरीर हे क्षणभंगूर आहे. मृत्यूनंतर सारे नष्ट होते.



 
मात्र अवयरुपी जिवंत रहायचे असेल तर ‘अवयव दान‘ सर्वात श्रेष्ठ पर्याय आहे. मृत्यूपश्चात एक देह सात जणांच्या आयुष्यात एक आशेचा किरण ठरू शकतो. तर ३५ लोकांच्या आयुष्याचा दर्जा सुधारू शकतो. मात्र आपल्या समाजात अवयवदानाविषयी फारशी जागृती नसल्याने कित्येक रुग्ण वर्षानुवर्ष प्रतिक्षेत आहेत.


 अवयव दान हे केवळ डोळे किंवा किडनी पुरता मर्यादित नसून शरीराचे सुमारे १० विविध अवयव दान करता येतात .पण त्याकरीता पुरेशी माहिती व इच्छा शक्ती नसते. त्यामुळे मरणोत्तर अवयव दानाचा संकल्प करण्यास फारशे कोणी पुढे येत नाहीत. मात्र पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर आणि त्यांच्या पत्नी वर्षा ठाकूर यांनी महत्वाचे पाऊल उचलत समाजापुढे आदर्श ठेवला आहे. 

 त्यांनी भारत सरकारच्या pledge.mygov.in/organ-donation या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अवयव दानाची शपथ घेतली. मृत्यूनंतर देखील आपण इतरांच्या कामी येऊ शकतो, आपल्या एका कृतीमुळे दुसऱ्या व्यक्तीचे जीवन सुखकर करत त्याला नवीन जीवनदान देऊ शकतो, या भावनेतून ठाकूर दांपत्याने पुढाकार घेतला. 




कोट- 
आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी सीमेवर तैनात जवान स्वतःच्या प्राणांचे बलिदान देऊन हुतात्मा होतात. आज आरोग्य विज्ञानातील संशोधनामुळे एखादा सामान्य नागरिकही जीवनदानासारखे सर्वोच्च दान देऊन, मृत्यूनंतरही आपल्या अवयवांच्या रूपाने अमर होतो. मानवता हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे, हे सिद्ध करणारी कृती म्हणजे अवयव दान.आज मी व पत्नी वर्षा हिने भारत सरकारच्या pledge.mygov.in/organ-donation या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अवयव दानाची शपथ घेतली. मृत्यूनंतर देखील आपण इतरांच्या कामी येऊ शकतो, आपल्या एका कृतीमुळे दुसऱ्या व्यक्तीचे जीवन सुखकर करत त्याला नवीन जीवनदान देऊ शकतो, ही भावना अतिशय सुखदायी आहे. आपण सर्वही या कृतीसाठी पुढे या, अवयव दानाची शपथ घ्या आणि इतरांनाही याबाबत माहिती द्या.- आमदार प्रशांत ठाकूर 



थोडे नवीन जरा जुने