पनवेल: दि. 6 डिसेंबर (4K News) शेतकरी कामगार पक्षाला पुन्हा एकदा जोरदार हादरा बसला असून उसर्ली ग्रामपंचायतीमधील शेकापच्या सरपंच अनिता भगत यांच्यासह ग्रामपंचायतीचे सदस्य माजी सरपंच, माजी उपसरपंचांनी भारतीय जनता पार्टीचे विकासाचे कामळ हाती घेतले आहे. विचुंबे येथे झालेल्या या पक्ष प्रवेशावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सर्व प्रवेश कर्त्यांचे पक्षाची शाल देऊन पक्षात स्वागत. यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी आणि तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत उपस्थित होत
या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सबका साथ सबका विकास हे सुत्र देशासह संपूर्ण समाजाचा विकास करत आहे. त्यामुळे तुमच्या येण्याने उसलीं ग्राममपंचायतीमध्ये भारतीय जनता पार्टीला जनतेची सेवा करण्याची ताकद मिळाली असल्याचे प्रतिपादन केले.
पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सर्व सामान्यांच्या हिताचे निर्णय घेत त्यांना विविध सुविधा उपलब्ध करुन देण्याचे काम होत आहे.
विचुंब्यातील दिप सीटी इमारतीमध्ये झालेल्या या पक्ष प्रवेशावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, विजय भगत, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमित जाधव, पळस्पे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, विचुंबे ग्रामपंचायतीचे सरपंच प्रमोद भिंगारकर, शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद ढवळे, माजी उपसरपंच किशोर सुरते, मच्छिंद्र पाटील, राजेश पाटील, जयंत भगत, यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते.
Tags
पनवेल