पनवेल (प्रतिनिधी) संविधान दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारमंच पुरस्कृत सधम्म सामाजिक संस्था आणि विवेक विचार मंच पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक ०३ डिसेंबर रोजी 'संविधान' विषयावर ज्येष्ठ विधीज्ञ ऍड. उज्वल निकम यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
खांदा कॉलनी येथील श्री कृपा हॉलमध्ये सकाळी १० वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार प्रशांत ठाकूर यांची तर प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षणतज्ञ, सामाजिक व राजकीय विश्लेषक डॉ. जी. के. डोंगरगावकर यांची उपस्थिती असणार आहे. यावेळी आयोजकांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे.
Tags
पनवेल