पनवेल: दि. 6 डिसेंबर (4K News)चांगु काना ठाकूर आर्टस् , कॉमर्स अँड सायन्स कॉलेज , न्यू पनवेल (स्वायत्त) येथे “होस्ट पॅथोजन इंटरप्ले इन द इमर्जन्स अँड रीइमर्जन्स ऑफ व्हायरल डीसीजेस” याविषयावर पॉप्युलर सायन्स लेक्चर चे इंडिअन वुमेन सायंटिस्ट असोसीएशन, वाशी नवी मुंबई आणि सूक्ष्मजीवशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय व्याख्यानाचे दि. ३० नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी १०.३० वाजता जागतिक एड्स दिनाच्या निमित्ताने आयोजन करण्यात आले होते.
व्याख्यानाच्या उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून एन.आय.आर.आर.सी.एच., परेल मुंबई येथील बायोकेमिस्ट्री आणि व्हायरोलॉजी विभागाचे प्रमुख मा. डॉ. वैनव पटेल व इंडिअन वुमेन सायंटिस्ट असोसीएशनच्या संयुक्त सचिव डॉ. सुपर्णा कामत उपस्थित होते. तसेच विभागातील ८५ विद्यार्थी व शिक्षकवर्ग यांनी उपस्थिती दर्शविली.
या व्याख्याना दरम्यान डॉ. पटेल यांनी महामारीविषयक तत्त्वे संबोधित केली जसे की विषाणूजन्य संसर्गाच्या अस्तित्वासाठी त्यांची प्रासंगिकता, घटना आणि त्यानंतरच्या महत्त्वाच्या भूतकाळातील उदयोन्मुख आणि पुन्हा उदयास येत असलेल्या विषाणूजन्य संसर्गांचे पुनरावलोकन,जे बाल आणि माता आरोग्याशी संबंधित आहे तसेच तांत्रिक साधने, लसीकरण कथा, त्यांच्या मर्यादा, तीव्र व्हायरल इन्फेक्शन्सची आव्हाने याबद्दल चर्चा केली.
या कार्यक्रमाची प्रस्तावना व पाहुण्यांची ओळख सूक्ष्मजीवशास्त्र विभाग प्रमुख प्रा. एन. सी. वडनेरे यांनी केली. तसेच आभार प्रदर्शन प्रा. जी. एस. साठे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी कु. निशा जांगीड हिने केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. अन्वेष वेमुला ,प्रा. नमिता गरुडे आणि प्रा. श्वेता हुंबरवाडी यांनी अथक परिश्रम घेतले.
प्रस्तुत कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. एस. के. पाटील, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन मा. श्री. रामशेठ ठाकूर साहेब, संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन मा. श्री. वाय. टी. देशमुख,पनवेलचे मा. आमदार श्री. प्रशांत ठाकुर व संस्थेचे सचिव मा. डॉ. एस. टी. गडदे यांनी आयोजकांचे कौतुक केले.
Tags
पनवेल