घरफोडी करून जवळपास एक लाख तीस हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना पनवेल तालुका पोलिसांनी घेतले ताब्यात


पनवेल दि ०९डिसेंबर (4K News) : पनवेल तालुकयातील खारपाडा नाका येथील एका मोबाईल इलेकट्रीक दुकानात घरफोडी करून जवळपास एक लाख तीस हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना पनवेल तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून घरफोडी चा मुद्देमाल मोठ्या प्रमाणात हस्तगत केला आहे. 


                येथील भरत मोबाईल व इलेक्ट्रिक दुकानाचे छताचा पत्रा काश्याच्या तरी सहाय्याने फोडून अज्ञात चोरट्याने आत प्रवेश करून दुकानातील एकूण एक लाख एकोणतीस हजार सहाशे रुपये किमतीच्या इलेक्ट्रिक वस्तू, मोबाईल व रोख रक्कम असा मुद्देमाल चोरून नेला होता .

याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील व गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जगदीश शेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय गळवे, पोलीस हवालदार विजय देवरे, पोलीस हवालदार महेश धुमाळ, पोलीस हवालदार सुनील कुदळे व पोलीस शिपाई आकाश भगत आदींच्या पथकाने तांत्रिक तपास व गुप्त बातमीदाराच्या माहितीच्या आधारे या गुन्ह्यातील आरोपी अदिल मजिबूर शेख (वय २१) व मुस्तकीम उमर फारुख शेख (वय २२) हे दोघे मुंब्रा परिसरात लपले असल्याची माहिती मिळाल्याने या पथकाने सदर ठिकाणी सापळा रचून या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे. व त्यांच्या कडून घरफोडी चा मुद्देमाल मोठ्या प्रमाणात हस्तगत केला आहे. थोडे नवीन जरा जुने