पनवेल परिसरातील ८ पान टपऱ्यांवर अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई मोठ्या प्रमाणात गुटखा केला हस्तगत*





पनवेल दि.१३ डिसेंबर (4K News) महाराष्ट्रात गुटखा, सुगंधित तंबाखू, पान मसाला यांच्या विक्रीस बंदी असतानाही बेकायदेशीरपणे अश्या प्रकारे विक्री करणाऱ्या पनवेल परिसरातील ८ पान पान टपऱ्यांवर अन्न व औषध प्रशासन विभाग पेण च्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी छापा टाकून कारवाई केली आहे.

 या कारवाईत मोठ्या प्रमाणात गुटखा, सुगंधित तंबाखू व पान मसाला हस्तगत केला आहे.


शहरातील गांधी हॉस्पिटल जवळील मुस्ताक पान शॉप , शिंदे पान शॉप यांच्यासह आलम पान शॉप, आयुब भाई पान शॉप, संतोष डेअरी, साईराज पान शॉप, सुरेंद्र पान शॉप, शिमला पान शॉप या विविध ठिकाणच्या पान टपऱ्यांवर अन्न व औषध प्रशासन अधिकारी विक्रम निकम व त्यांच्या पथकाने या ८ जणांवर कारवाई करून त्यांच्या कडून जवळपास साडे तेवीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हातगत करून .







त्यांच्या विरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली आहे. अश्या प्रकारच्या कारवाईमुळे बेकायदेशीर रित्या व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.






थोडे नवीन जरा जुने