नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पनवेल परिसरातील फार्महाऊसह रिसॉर्टना वाढती मागणी

     

पनवेल दि.१२ डिसेंबर (4K News)नवीन वर्षाचे स्वागत आणि जुन्या वर्षाला निरोप देण्यासाठी अनेकजण उत्सुक आहेत. तरुण वर्गासह अनेकांना आता उत्सुकता लागली आहे. तळीराम तर आतापासूनच निवांत जागा शोधू लागले आहेत.

मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, आदी परिसरातील नागरिकांना पनवेल हे जवळचे ठिकाण असल्याने मोठ्या प्रमाणात नववर्षाचे स्वागत करण्यासाठी नागरिक येथे दरवर्षी येत असल्याने यंदाही या भागातील हॉटेल, फार्महाउस व रिसॉर्टना चांगलीच मागणी आहे.


पनवेल जवळील गाढेश्वर धरण अगदी निसर्गाच्या कुशीत वसलेले असल्यामुळे त्याचप्रमाणे चारही बाजूचा निसर्ग झाडांनी बहरलेला आहे. मुख्य म्हणजे, चारही बाजूला मैदान आहेत. अनके फार्महाउस याभागात आहेत. त्यामुळे सदर फार्महाउस बुक करण्यासाठी लोकांची ऑनलाईन बुकिंग सुरु झाली आहे. यावर्षी थर्टी फर्स्ट हा रविवारी येत असल्यामुळे काहीना शनिवार आणि रविवार अशा सुट्टी असल्यामुळे आतापासूनच ऑनलाईन बुकिंगला सुरुवात झाली आहे. रविवारी थर्टी फर्स्ट असल्यामुळे शुक्रवारपासून पर्यटक हजेरी लावतील, असा अंदाज व्यावसायिकांकडून वर्तविला जात आहे.त्या दृष्टीने त्यांनीसुद्धा नववर्षाच्या स्वागताची तयारी सुरु केली आहे. आवश्यक त्या शासकीय परवानग्या, अर्ज, आत्ता संबंधित पोलीस ठाण्यात करण्यात येऊ लागले आहेत. या दोन दिवसांमध्ये लाखो रुपयांची उलाढाल पनवेल बाजारपेठेत होणार असल्याची व्यापारी वर्ग वर्तवित आहेत.थोडे नवीन जरा जुने