पनवेल दि.१२ डिसेंबर (4K News): आमच्या शेठना नवसाने मुलगा झाला आहे तरी ते पैसे किंवा साड्या वाटप करत आहेत, अश्या प्रकारच्या वेगवगेळ्या बतावण्या करून ज्येष्ठ नागरिक महिलांना करून त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने लबाडीने काढून घेणाऱ्या सराईत गुन्हेगारास पनवेल शहर पोलिसांनी गजाआड केले आहे.
पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अश्या प्रकारच्या तीन घटना घडल्या होत्या. त्यामुळे ज्येष्ठ नागिरक असणाऱ्या महिलांमध्ये भीतीयुक्त वातावरण होते.
याबाबतच्या तक्रारी पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, पोलीस निरीक्षक गुन्हे अंजुमन बागवान, पोलीस निरीक्षक प्रशासन प्रविण भगत यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्हेगारांचा शोध सुरु असताना एक गुप्त बातमीदारांकडून या गुन्ह्या संदर्भातील आरोपीची माहिती पोलीस उपनिरीक्षक विनोद लभडे यांना मिळाली.
त्यानुसार सपोनि प्रकाश पवार, पोउपनि विनोद लभडे, पोहवा अविनाश गंथडे, पोहवा महेंद्र वायकर, पोहवा सुर्यकांत कुडावकर, पोहवा महेश पाटील, पोहवा अमोल पाटील, पोना अशोक राठोड, पोना मिथुन भोसले, पोशि विशाल दुधे आदींच्या पथकाने आरोपी सुरेश गोविंद काळे (वय ४३ वर्षे) रा. नेवाळी गांव, कल्याण येथुन ताब्यात घेवुन त्याच्याकडे गुन्हयाचे अनुषंगाने तपास केला असता त्याने पनवेल परिसरात अश्या प्रकारची तीन गुन्हे त्याचप्रमाणे मुंब्रा पोलीस ठाणे परिसरात १, दादार पोलीस ठाणे परिसरात ०१ व कांजुर मार्ग पोलीस ठाणे परिसरात १ असे एकुण सहा गुन्हे उघडकीस आणण्यात पनवेल शहर पोलीस ठाण्याकडील अधिकारी यांना यश आले आहे.
Tags
पनवेल