किचकट खुनाच्या गुन्ह्याची उकल केल्याप्रकरणी पनवेल तालुका पोलिसांचे पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांनी विशेष प्रशस्तीपत्रक देऊन केले कौतुक

   
           
   

पनवेल : दि.१२ डिसेंबर (4K News)पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत डिसेंबर २०२१ या महिन्यात डोंगराळ भागात एक इसमाचा मृतदेह आढळून आला होता. सदर मृतदेहाचा चेहरा दगडाने ठेचून त्याचा मृतदेह जाळण्यात आला होता. 





अश्या किचकट खुनाची उकल पनवेल तालुका पोलिसांनी अथक परिश्रमाने अनेक सीसीटीव्ही फुटेज व गुप्त बातमीदारांच्या माहितीच्या आधारे शोध घेऊन तीन आरोपीनं गजाआड केल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वपोनि व त्यांच्या पथकाचे विशेष प्रशस्तीपत्रक देऊन कौतुक केले आहे. 






                सदर गुन्ह्यामध्ये आरोपींनी मयत इसमास त्याच्याच मोटारसायकलीवरून त्याला दारू पाजून पनवेल तालुक्यातील मालडुंगे डोंगरावर नेले व स्वतःच्या फायद्याकरता मुख्य आरोपीने त्याचा गळा आवळून त्याला ठार मारले. त्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर दगड टाकून इतर साथीदाराच्या मदतीने चेहऱ्याचा चेंदामेंदा केला व पुन्हा ओळख पटू नये म्हणून त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळून टाकले व ते तेथून पसार झाले होते. याबाबतची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात दाखल होताच तात्काळ वपोनि रवींद्र दौडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. 



पोलीस निरीक्षक संजय गळवे, पोहवा विलास साळवी, पोहवा सुनील कुदळे आदींसह पोलीस ठाण्यातील इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अथक मेहनत घेत या गुन्ह्याची उकल घेण्याच्या दृष्टीने २४ तास मेहनत करून, बारकाईने तपास करून अनेक सीसीटीव्ही फुटेज, पेट्रोल पंप, वाईन शॉप, बियर बार आदी ठिकाणी तपास करून मुख्य आरोपीस कोकणातून व त्याच्या २ साथीदारांना बिहार येथून ताब्यात घेतले असता त्यांनी या खुनाची कबुली दिली असून सध्या ते तळोजा जेल येथे शिक्षा भोगत आहेत. अत्यंत क्लिष्ट अश्या गुन्ह्याची उकल केल्याबद्दल तत्कालीन वपोनि रवींद्र दौडकर यांचे विशेष कौतुक महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी केली असून नुकत्याच नवी मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयात पार पडलेल्या विशेष समारंभात नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भांबरे यांच्या हस्ते व इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वपोनि रवींद्र दौडकर, सहा. पोलीस निरीक्षक संजय गळवे, पोहवा विलास साळवी, पोहवा सुनील कुदळे यांना सदर विशेष प्रशस्तीपत्रक देऊन ‘गुणात्मक अन्वेषणासाठी सर्वोत्कृष्ट प्रयत्न' हा पुरस्कार त्यांना देण्यात आला आहे. याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. 


थोडे नवीन जरा जुने