लोकनेते रामशेठ ठाकूर यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर पत्रकार दिनानिमित्त पनवेलमध्ये आंतरराष्ट्रीय एक्सलन्स अवॉर्ड सोहळा




पनवेल : दि.१२ डिसेंबर (4K News)दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय एक्सलन्स अवॉर्ड पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम रविवार दि. ०७ जानेवारी २०२४ रोजी पनवेल मधील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सकाळी १० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. 




सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, वैद्यकीय, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात अविरतपणे उल्लेखनीय कार्य करणारे आणि सर्व समाजाला प्रेरणादायी असलेले माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.





पत्रकार दिनानिमित्त पत्रकार मेळावा व आंतरराष्ट्रीय एक्सलन्स पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने पत्रकारिता तसेच इतर क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणार्‍या कर्तृत्ववान महिला व पुरुषांचा या सोहळ्यात सन्मान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास संपूर्ण देशातील तसेच परदेशातील पुरस्कारार्थी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार श्रीरंग बारणे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार प्रसाद लाड, उद्योजक जे.एम. म्हात्रे, संपादक विवेक मेहेत्रे आदी मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले असून या सोहळ्यास नागिरकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. महेंद्र देशपांडे यांनी केले आहे.


थोडे नवीन जरा जुने