सामाजिक कार्यकर्ते समीर माखेचा यांनी जपली सामाजिक बांधिलकी १२ गरजू विद्यार्थ्यांना दिल्या मोफत सायकलीपनवेल दि.१३ डिसेंबर (4K News): पनवेल शहरातील सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक समीर माखेचा यांनी सामाजिक बांधिलकी जपत गरजवंत शालेय विद्यार्थ्यांना १२ सायकलींचे वाटप आज केले.समीर माखेचा हे पनवेल शहरातील गुरुशरणम सोसायटी येथे राहतात त्या ठिकाणी अडगळीत अश्या १०-१२ सायकली पडल्या होत्या. सोसायटी व्यवस्थापन सदर सायकली भंगारात काढणार होते. 

ही बाब त्यांच्या लक्षात येताच त्यांनी सोसायटीचे चेअरमन जितू महाजन व सचिव दर्पण कोचर यांच्याशी संपर्क साधला व या सायकली मला दिल्यास मी सामाजिक कामामध्ये याचा वापर करीन असे सांगिलते त्यानुसार त्यांनी सदर सायकली ताब्यात घेऊन त्यांची पूर्ण दुरुस्ती केली व त्यांना नवीन सायकलींप्रमाणे बनवले व शहरातील नूतन गुजराती विद्यालय संस्थेच्या शेठ लक्ष्मीदास भास्कर हायस्कुल येथील १२ गरजू विद्यार्थ्यांना या सायकली मोफत वापरण्यासाठी
 दिल्या. त्याच्या या सामाजिक कार्याबद्दल समाजातील सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.थोडे नवीन जरा जुने