पनवेलमध्ये भारत विकास परिषद संस्थेच्या वतीने क्षेत्र स्तरीय भारत को जानो" स्पर्धेचे आयोजनपनवेल : दि.१२ डिसेंबर (4K News) भारत विकास परिषद संस्थेच्या वतीने पनवेलमध्ये "क्षेत्र स्तरीय भारत को जानो" स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास प्रमुख मान्यवर म्हणून आमदार प्रशांत ठाकूर, उद्योजक आतिष कुलकर्णी यांची उपस्थिती लाभणार असून स्पर्धेचे उदघाटन भारत विकास परिषदेचे राष्ट्रीय संघटन मंत्री सुरेश जैन यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. 


भारत विकास परिषद ही एक राष्ट्रव्यापी अराजकीय सामाजिक संस्था आहे. संपर्क, सहयोग, संस्कार, सेवा आणि समर्पण ह्या पंचसुत्रावर आधारीत संस्थेचे विविध उपक्रम राबविले जातात.


"संस्कार" उपक्रमाअंतर्गत 'गुरू वंदन छात्र अभिनंदन', 'राष्ट्रीय समूहगान स्पर्धा' आणि 'भारत को जानो प्रश्नमंजुषा' असे तिन कार्यक्रम शालेय व शाखा स्तरावर घेण्यात येतात. यामधे पनवेल तालुक्यातील अग्रगण्य बहुतांश शाळा सहभागी होतात.
*क्षेत्रस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धा* आयोजनामधे, कोकंण प्रांताचे प्रतिनिधित्व यावर्षी भारत विकास परिषद पनवेल शाखा करित आहे.*ही स्पर्धा रविवार दिनांक १० डिसेंबर रोजी सीकेटी महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी मुंबई, पश्चिम-महाराष्ट्र, कोंकण, गोवा, विदर्भ, देवगिरी, सौराष्ट्र आणि गुजरात अशा आठ प्रांतांचे ज्युनिअर व सिनियर गटातून प्रत्येकी दोन, दोन विद्यार्थी प्रतिनिधित्व करतील. स्पर्धेला विविध प्रांतातील विद्यार्थी, त्यांचे पालक, शिक्षक, तसेच भारत विकास परिषदेचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. पनवेल मध्ये अशा स्पर्धांचे आयोजन प्रथमच करण्यात येत आहे.
पनवेल मधील विद्यार्थी,पालक आणि सर्व नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून भारत विकास परिषद पनवेल शाखेस प्रोत्साहन द्यावे,असे आवाहन शाखेच्या अध्यक्षा डाॅ. कीर्ती समुद्र, सचिव पद्मजा कुलकर्णी, कोषाध्यक्ष शितल विचारे व संस्कार प्रोजेक्ट समन्वयक ज्योती कानिटकर यांच्यावतीने करण्यात आले आहे.थोडे नवीन जरा जुने