रोख रक्कम असलेली पिशवी खेेचून दोेन अनोळखी इसम पसार






पनवेल, दि.2 (वार्ताहर) ः रोख रक्कम असलेली पिशवी खेेचून दोेन अनोळखी इसम पसार झाल्याची घटना पनवेल शहरातील एमएसईबी कार्यालयाजवळ घडली आहे.





शंतानसिंग देवळा (37) हा त्याच्या ताब्यातील आकाशी रंगाच्या पिशवीमध्ये रोख रक्कम 43 हजार रुपये घेेवून या परिसरातून चालला असताना दोन अनोळखी इसमांनी त्याच्या हातातील पिशवी जबरीने खेचून ते रोख रक्कम घेवून पसार झाले आहेत. याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.


थोडे नवीन जरा जुने